मुंबई-पुणे प्रवासासाठी तब्बल ५ हजार रुपये, दिवाळीत प्रवाशांची खासगी बसचालकांकडून लूट; परिवहन विभागाकडून कारवाई सुरू

Private Bus Fare: : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे प्रवासासाठी खासगी बसचालकांकडून तब्बल ५ हजार रुपये भाडे आकारले जात असल्याचे समोर आले आहे.
Private Bus Fare

Private Bus Fare

ESakal

Updated on: 

मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना खासगी बसच्या अवाजवी भाडेवाढीचा फटका बसत आहे. मुंबई-पुणे स्लीपर बससाठी तब्बल पाच हजार रुपये, मुंबई-औरंगाबादसाठी ९,९९९ रुपये, तर मुंबई-नागपूरसाठी आठ हजार रुपये भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे, नियमित दरांच्या तुलनेत दोन ते तीनपट भाडेवाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी बसचालकांच्या जादा भाडेवसुलीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ ते २० नोव्हेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

Loading content, please wait...