IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांचे वडील आहेत कोट्यधीश; वंचितकडून लढवली होती लोकसभा निवडणूक

Probationary IAS officer Pooja Khedkar: खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar

पुणे- २०२३ बॅचच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या. आता पूजा खेडकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खेडकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा लढवली होती. त्यांची एकूण संपत्ती ४० कोटी इतकी आगे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणात रोहित पवारांनी उठवला आवाज; म्हणाले, कागदपत्रांची फेरफार करुन...

पूजा खेडकर यांनी अपंग व्यक्तीच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली आहे. तसेच, त्यांनी ओबीसी नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचं सांगण्यात येतंय. पूजा खेडकर यांचे वडील हे प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त सरकारी अधिकारी होते. नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचा पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे.

दिलीप खेडकर हे अधिकारी असताना त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांचे निलंबनही झाले होते. त्यांचे मुळ गाव पाथर्डीमधील भालगाव आहे. अभियांत्रिकीचे त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन मुलं आहेत. पूजा खेडकर या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी आहेत, तर पियुष हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप खेडकर यांना १३ हजार ७४९ मतं मिळाली होती.

IAS Pooja Khedkar
IAS officer Pooja Khedkar: ऑडीला लाल दिवा लावून फिरणाऱ्या IAS पूजा खेडकरची संपत्ती किती? ओबीसी प्रवर्गातून झाली IAS पण आता...

दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष होते. माहितीनुसार, त्यांनी पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी मोहटादेवीला साकडे घातले होते. दीड किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण करणार असल्याचं ते म्हणाले होते. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी आपले साकडे पूर्ण केले होते. सुजय विखेंसोबत वाद झाल्यानेच त्यांनी वंचितकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

परिविक्षाधीन आयएएसला मंजूर नसलेल्या सुविधा पूजा खेडकर मागत होत्या. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्टची दखल घेत त्यांनी वाशिशमध्ये बदली करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिपोर्टमध्ये पूजा खेडकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरची एक खोली देखील ताब्यात घेतली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com