अधिकाऱ्यांची बढती, कलावंतांची कधी? 

नितीन नायगावकर
मंगळवार, 5 जून 2018

संपूर्ण महाराष्ट्रात आज जवळपास 28 हजार वृद्ध कलावंतांची सरकार दरबारी नोंद आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक दर्जानुसार अ, ब आणि क श्रेणीत ही विभागणी करण्यात आली आहे. यातील क श्रेणीत असलेल्या एखाद्या कलावंताला आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला, तरी त्याला स्थानिक दर्जानुसारच मानधन दिले जाते. मात्र, श्रेणीमध्ये बदल करण्याची कुठलीच तरतूद राज्य सरकारच्या अध्यादेशात नाही. तत्कालीन संचालकांनी मार्च 2017 ला सरकारकडे या नियमात शिथिलता आणावी, अशी शिफारस केली होती. 

नागपूर : प्रशासकीय सेवा परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर सरकारी अधिकाऱ्यांची बढती होते, पण वृद्ध कलावंतांची साधी श्रेणीसुद्धा वर्षानुवर्षे बदलली जात नाही. त्यामुळे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकाविणारे अनेक साहित्यिक-कलावंत आयुष्यभर सरकार दरबारी मात्र "क' दर्जातच मोजले जातात. या नियमांत बदलाची शिफारस राज्य सरकारकडे विचाराधीन असून, प्रत्यक्ष अमलात येण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात आज जवळपास 28 हजार वृद्ध कलावंतांची सरकार दरबारी नोंद आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक दर्जानुसार अ, ब आणि क श्रेणीत ही विभागणी करण्यात आली आहे. यातील क श्रेणीत असलेल्या एखाद्या कलावंताला आयुष्याच्या उत्तरार्धात राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला, तरी त्याला स्थानिक दर्जानुसारच मानधन दिले जाते. मात्र, श्रेणीमध्ये बदल करण्याची कुठलीच तरतूद राज्य सरकारच्या अध्यादेशात नाही. तत्कालीन संचालकांनी मार्च 2017 ला सरकारकडे या नियमात शिथिलता आणावी, अशी शिफारस केली होती. 

प्रत्येक कलावंताचे त्या त्या कालावधीतील कर्तृत्व लक्षात घेऊन त्याच्या श्रेणीमध्ये बदल व्हायला हवा आणि त्यानुसारच मानधन मिळायला हवे. मी काही वर्षांपूर्वी यासंदर्भात सरकारकडे विचारणा केली होती, पण नियमांत बदल होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. 
- गणेश नायडू, ज्येष्ठ रंगकर्मी 

श्रेणी व मानधन (वार्षिक) 
अ ः 25,200 रुपये 
ब ः 21,600 रुपये 
क ः 18,000 रुपये 

Web Title: Promotion of officers, artists ever?