Appointment of PSI candidates in Maharashtra delayed for over two and a half years : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०२२ साली घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षेचा अंतिम निकाल १० जानेवारी २०२५ रोजी जाहीर झाला. त्यानंतर एमपीएससीने ६०३ उमेदवारांना शिफारस पत्रही दिले. मात्र यापैकी पीएसआयसाठी निवड झालेल्या या उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाहीये. गेली अडीच वर्ष हे उमदेवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. ही नियुक्ती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांना आता आर्थिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हे उमेदवार आता आक्रमक झाले आहेत.