Abhijeet Bichukale: मी सांगेल त्याला आमदार करा; यांचे एकमेकांशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijeet Bichukale

Abhijeet Bichukale: मी सांगेल त्याला आमदार करा; यांचे एकमेकांशी...

पुणे: या-ना त्या कारणाने चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले यांनी आज पुण्यात एक हटके आवाहन केलय. मी सांगेल त्याला आमदार करा, असं सांगत राज्यातील नेत्यांबद्दल टिपण्णी केली आहे.

'सकाळ डिजिटल'शी बोलतांना अभिजीत बिचुकले म्हणाले की, सध्याचं राजकारण हे कॉलेजमधील तरुण-तरुणी एकमेकांना जशा शिव्या घालतात, तसं झालंय. सध्या राजकारणात असलेले सगळे नेते हे साठ वर्षांच्या पुढचे आहेत. या लोकांना जनतेचं काही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त त्यांच्या मुलांसाठी कमवायचं आहे. त्यांची पोरं काय करतात, हे सांगायची गरज नाही. सातारा नगर पालिकेमध्ये आपण लक्ष घालणार असल्याचंही बिचुकले यांनी यावेळी सांगितलं.

''सर्वसामान्यांच्या नावावर आतापर्यंत नेत्यांनी पोटं भरली. परंतु मी एकटा आहे, ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही. त्यामुळे जनतेने मी सांगेन तो उमेदवार निवडून द्यावा. या सगळ्यांनाच आता घरी बसवा. कारण या नेत्यांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत.'' अशा शब्दांमध्ये बिचुकले यांनी पुण्यात बोलतांना भावना व्यक्त केल्या.

'बिग बॉसमुळे मी चर्चेत आलो'

''मी बिग बॉसमुळे चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात आलो. त्यामुळे सातारच्या नेत्यांनी जुनी केस काढून मला जेलमध्ये टाकलं. परंतु बिग बॉसने मला हिंदीतही घेतलं. कारण टॅलेंट'' असं सांगून बिचुकले यांनी बिग बॉसच्या आठवणींना उजाळा दिला.