Balbharti : ...म्हणून वसंतराव नाईक यांनी केली होती बालभारतीची स्थापना

वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
Balbharti
Balbhartisakal

Balbharti : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आज हे मंडळ बालभारती या नावाने ओळखले जाते. (Pune : Balbharti Foundation Day read why Vasantrao Naik had established balbharti read story )

१९६४ वर्षी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारांनी व्यावसायिक तत्त्वावर चालणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी अशी कोठारी आयोगाने शिफारस केली होती. त्यानुसार जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली.

बालभारती स्थापण करण्यामागील उद्दिष्टे :

  • शालेय शिक्षणाच्या अभिवृद्धीसाठी एक प्रोत्साहन देणारा मार्ग

  • शालेय पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तिका, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय पुस्तिका,पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे

  • पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्याची छपाई, प्रकाशन, साठा, वितरण व विक्रीची व्यवस्था करणे

Balbharti
Pune News : मोबाईल शॉपी मधुन चोरीला गेलेले १३ लाख रुपये किंमतीचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

पुणे येथे मंडळाचे मुख्य कार्यालय असून मुंबई येथे नियंत्रक कार्यालय आहे.पाठ्यपुस्तकांच्या वितरणासाठी गोरेगांव (मुंबई), पनवेल, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर व अमरावती येथे प्रमुख विभागीय भांडारे सुद्धा आहे.

दैनंदिन कामकाजासाठी मंडळाचे विद्या, निर्मिती, वित्त, प्रशासन, वितरण, स्थावर, विधी व माहिती, अंतर्गत लेखापरीक्षण, संशोधन, संगणक, ग्रंथालय, किशोर असे बारा विभाग कार्यरत आहे.

Balbharti
Balbharati : समाजात हे काय चाललंय ? 'ईदगाह' धड्यावरून बालभारतीचं स्पष्टीकरण; पाहा व्हिडिओ

बालभारतीमार्फत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या प्राथमिक ते उच्चमाध्यमिक शाळांतील पहिली ते बारावी या इयत्तांची सर्व पाठ्यपुस्तके पुरवली जातात. इयत्ता पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती बालभारती करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com