Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापले; अखेरच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात

पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली
Pune Bypoll Election
Pune Bypoll Electionesakal

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला आहे. तर आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघात चांगलेच वातावरण तापले आहे. (Pune By poll Election CM Eknath Shinde congress road show Last day campaign )

कसबा पोटनिवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून दुपारी ते रोड शो करणार आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरणार आहेत. दुपारी बारा वाजता समता भूमी येथून रोड शोला सुरुवात होणार आहे.

कॉंग्रेसकडूनही दुपारीच भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास निवडणुकीत प्रचाराचा धुराळा पाहायला मिळाणार आहे.

Kasba By Poll Election: कसब्यात राज ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या निवडणुकीत दिसून येत आहे.

Kasba ByElection : कसबा, चिंचवडमध्ये रात्री-अपरात्री फिरण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर का आली?

चिंचवडमध्ये यापूर्वी भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, यांच्यासह विविध नेत्यांनी तळ ठोकून निवडणूक हातात घेतली आहे.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची वेळ आहे. त्यापूर्वी प्रचाराची रणधुमाळी सुरू असणार आहे. आज सहा नंतर कडक आचार संहिता लागू होणार आहे. उल्लघन करणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे.

मतदान केंद्राच्या १०० मीटर अतंरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Kasba ByElection : कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर...; फडणवीसांनी उपस्थित केला प्रश्न

26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी केली जात असून 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. खरंतर ही निवडणूक सुरुवातीपासूनच भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com