Pune News: पुण्यातील चक्काजाम आंदोलन भोवलं; ३७ रिक्षा चालकांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune News: पुण्यातील चक्काजाम आंदोलन भोवलं; ३७ रिक्षा चालकांना अटक

पुण्यातील रिक्षाचालकांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात भडकले आहे. काही करुन आपल्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून रिक्षाचालकांनी रस्त्यावर रिक्षा लावल्या होत्या. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीही झाली होती. पुण्यातील आरटीओ जवळ वाहतूक कोंडी झाल्यानं लांबच लांब रांग लागल्याचे दिसून आल्या.

अहिल्याबाई होळकर घाटानजीक प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होवून रिक्षा बाजुला करुन वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. ९ तासांपेक्षा अधिक काळ रिक्षाचालक रिक्षा लावून गेल्यानं पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Nitesh Rane: शिंदे गट-भाजपातले मतभेद चव्हाट्यावर; नेत्याने नितेश राणेंना सुनावलं!

हेही वाचा-इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून. ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम १४३, १४५, १४७, १४९, १८८, ३३६, ३५३, ३४२ यासह क्रिमिनल लॉ amendment कलम ३,७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा केले आहेत.

तर इतर रिक्षा चालकांचा शोध पोलिसांकडून सुरू. तर चालकांना पोलिसांनी आंदोलन करू नका यासाठी कलम १४९ प्रमाणे नोटीस देखील जाहीर केली होती. त्यामुळे आता हे आंदोलन चिगळ्याची शक्यता आता राहिली नाही.

टॅग्स :puneauto