

पुणे: मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी गैरव्यवहारातील आरोपी संचालिका अर्चना सुरेश कुटे आणि आशा पद्माकर पाटोदेकर या दोघींना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने मंगळवारी (ता. १६) पुण्यातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दागिने आणि रोकड असा सुमारे दोन कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.