नाशिक देशातील सहावे; तर पुणे सतरावे थंड शहर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

मध्य महाराष्ट्रात येत्या शनिवारी (ता. १८) थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला असून, त्यानंतर थंडीचा कडाका अंशतः कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र शुक्रवारी गारठला. नाशिक हे देशातील सहावे; तर पुणे सतरावे थंड शहर म्हणून नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रात येत्या शनिवारी (ता. १८) थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला असून, त्यानंतर थंडीचा कडाका अंशतः कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मध्य महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांपासून थंडीचा लाट पसरली आहे. पुढील चोवीस तास थंडी कायम राहील, असा इशारा हवामान  खात्याने दिला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मालेगावसह सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव गारठलेले असेल. येत्या रविवारनंतर (ता. १९) किमान तापमानाचा पारा अंशतः वाढणार असल्याने थंडीचा कडाका कमी होईल, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

राज्यातील ही शहरे गारठली
राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सिअसने हे तापमान कमी झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्या खालोखाल जळगाव येथे ७; तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ८.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. औरंगाबाद येथेही किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस झाले.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune cool city