Narendra Dabholkar Case Live Updates
Narendra Dabholkar Case Live UpdatesEsakal

Narendra Dabholkar Murder Case: दाभोळकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; वाचा, कार्टाच्या निकालाविषयी सर्वकाही

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे न्यायालय आज निर्णय देणार असून, निकाल वाचनाला थोड्याच वेळात सुरूवात झाली आहे.

Sanatan : आज दाभोळकर प्रकरणी जो निर्णय दिला, त्याबद्दल आम्ही आभार मानतो - सनातन संस्था

दाभोळकर हत्या प्रकरणी आज न्यायालयाने जो निर्णय दिला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेने दिली आहे. आम्ही यापूर्वीही सांगत होतो की यात आमचा संबंध नाही. सनातन संस्थेची यात नाहक बदनामी करण्यात आली. दोघांना शिक्षा झाली आहे, पण ते हायकोर्टात दाद मागतील असंही संस्थेने म्हटलं आहे.

Sharad Pawar On Dobholkar Case: निकालाला इतकी वर्षे लागल्याने आम्ही अस्वस्थ होतो: पवार

डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रतकरणाच्या निकालाला इतकी वर्षे लागली त्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो. किमान काही तर निकाल त्यांनी दिलाय. दाभोळकर यांच्या आत्म्याला काहीतरी न्याय मिळावा. मुख्य सुत्रधार सुटला त्याबाबत राज्य सरकराने आपील करावा, असे शरद पवार म्हणाले.

Narendra Dabholkar Case: खटल्याच्या निकालाला लागलेला वेळ क्लेशदायक- नाना पटोले

या खटल्याच्या निकालाला जो वेळ लागला तो क्लेशदायक होता. ज्या दोन आरोपींना साक्षीदारांनी पाहिले होते त्यांना शिक्षा झाली. मात्र, मुख्य सूत्रधार तायडेची मुक्तता झाली. ही समाजाला लागलेली कीड आहे. शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा खून करण्याच्या प्रयत्न केला त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे.

अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला, सनातन संस्थेचा आरोप

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे साधक विक्रम भावे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला.

"...तर पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश वाचले असते"

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या दोन साधकांना जन्मठेप झाली आहे. सदर संस्था धर्माच्या आडून दहशतवादी कृत्य करते, हे पुन्हा सिध्द झाले आहे. हा निकाल ताबडतोब लागला असता तर पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या नसत्या. मारेकऱ्यांना शिक्षा झाली. पण प्रकरणातील मुख्य सुत्रधार निर्दोष सुटले. सुत्रधारांना शिक्षा झाली असती तर अधिक चांगला न्याय मिळाला असता. तरीही डाॅ. दाभोलकरांचे काम जोमाने पुढे नेऊ" असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले.

Sune Session Court: सुटलेल्या आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस, सरकार अपयशी: न्यायाधीश

या प्रकरणात सुटका झालेल्या आरोपींच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

Dabholkar Murder: आम्ही वरिष्ठ न्यायालयात जाणार, सरकारी वकिलांची माहिती

या प्रकरणातील सुटलेल्या आरोपींविरोधा आम्ही वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.

Sharad Kalaskar: दोन आरोपींना जन्मठेप; तिघांची सुटका

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना पुणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान पुराव्याअभावी इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करा करण्यात आली.

Hamid Dabholkar: सूत्रधाराच्या सुटकेविरोधात हमीद दाभोलकर जाणार उच्च न्यायालयात

या प्रकरणातील मुख्यं सूत्रधार सुटल्याचे म्हणत डॉ. दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

Sachin Andure: अंदुरे, कळसकरला जन्मठेप

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dabholkar Case Verdict: तावडे पुनवळके आणि भावे याची निर्दोष मुक्तता

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणातून तावडे पुनवळके आणि भावे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Dabholkar: आरोपी न्यायालयात हजर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील सर्व आरोपी न्यायालयात हजर.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघत आहे. तब्बल १० वर्षांनी काय निकाल लागणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे

Narendra Dabholkar: न्यायाधीश आरोपींच्या प्रतिक्षेत आहेत

डॉ. दाभोलकर प्रकरणात जेलमधील आरोपींना अजून हजर करण्यात आलेले नाही यामुळे न्यायाधीश आरोपींच्या प्रतिक्षेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com