Crime: पुण्यातील मंडई परिसरात तरुणावर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: पुण्यातील मंडई परिसरात तरुणावर गोळीबार

पुणे महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime Mahatma Phule market Shooting at a young man )

हेही वाचा: Rashmi Shukla : रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ! फोन टॅपिंग प्रकरणी नव्याने चौकशीचे आदेश

मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली माहिती आहे. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा: Rahul Shewale : त्याचे पाकिस्तान, कराची कनेक्शन...; पीडित तरुणीचे धक्कादायक खुलासे

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे हा रात्री ९ वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले, त्यानंतर त्यांनी गोळीबार केला.गंभीर जखमी झालेल्या शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Pune Newscrime