Rashmi Shukla : रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ! फोन टॅपिंग प्रकरणी नव्याने चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmi Shukla

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ! फोन टॅपिंग प्रकरणी नव्याने चौकशीचे आदेश

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत फोन टॅपिंग प्रकरणी पुन्हा वाढ होताना दिसत आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुन्हा एकदा तपासासाठी सर्व कागदपत्रे नव्याने चौकशीसाठी देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीवेळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी धक्कादायक खुलासा केलाय, त्यामुळे या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी डहाणे यांनी चौकशी करताना सांगितले की, रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: 31st Party Permission : थर्टीफर्ससाठी 7 लाख मद्यपींनी घेतले परवाने; नववर्षांसाठी 3 दिवसातील विक्रम

मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट मिळाल्यामुळे हल्लाबोल करण्यात आला होता. राज्यातील सरकार बदलताच शुक्ला यांना क्लीनचिट कशी मिळाली असंही बोलण्यात येत होतं.

हेही वाचा: रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ; फोन टॅपिंग प्रकरणी साक्षीदारांनी दिली धक्कादायक माहिती