Pune CrimeESakal
महाराष्ट्र बातम्या
Pune Crime: सोशल मीडियावरून मैत्री, वारंवार अत्याचार, नंतर गर्भधारणा, 14 वर्षीय मुलीसोबत जे झालं त्यानं पुणे हादरलं
Pune Girl Abused Case पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Pune Crime: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. तर अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भधारणा केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 23 वर्षीय आरोपीने मुलीशी सोशल मीडिया साइटवर मैत्री केली आणि त्यानंतर या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

