बचत गटांच्या पतपुरवठ्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल

कोरोना संसर्गाच्या काळातही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने जिल्ह्यात महिला बचत गटांना विविध बॅंकांकडून १९७ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला.
self help group
self help groupe sakal
Summary

कोरोना संसर्गाच्या काळातही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने जिल्ह्यात महिला बचत गटांना विविध बॅंकांकडून १९७ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला.

पुणे - राज्यातील महिला (Women) बचत गटांमार्फत (Self Help Group) विविध उत्पादनांची (Production) निर्मिती व्हावी, या उत्पादनांच्या विक्रीतून नफा मिळवून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने त्यांची उत्पादनांसाठी महिला बचत गटांना अल्प व्याजदराने उपलब्घ करून दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या कर्ज पुरवठ्यात (पतपुरवठा) (Credit Lending) पुणे जिल्हा परिषदेने (Pune ZP) राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोरोना संसर्गाच्या काळातही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने जिल्ह्यात महिला बचत गटांना विविध बॅंकांकडून १९७ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंतचे हे सर्वाधिक वाटप असल्याची नोंद राज्य पातळीवर झाली आहे.

वर्धा जिल्हा परिषदेने राज्यात दुसरे तर, सोलापूर जिल्हा परिषदेने तिसरे स्थान पटकावले आहे. बचत गटांना करण्यात आलेला पतपुरवठा हा नवीन उद्योग-व्यावसायांच्या स्थापनेसाठी मदत करतात. परिणामी महिलांना उद्योजिका बनविण्यास आणि त्यांनी निर्माण केलेल्या उद्योग-व्यावसायांच्या माध्यमातून नोकऱ्या निर्माण करण्यास मदत होत असते. शिवाय यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होत असते, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या निकालानंतर गुरूवारी (ता.२८) व्यक्त केले.

राज्यातील महिला बचत गटांना पतपुरवठा करण्याबाबतचे वार्षिक उद्दिष्ट महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून निश्चित केले जाते. या उद्दिष्टांपेक्षा अधिक कर्जवाटप करणाऱ्या बॅंकांमध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युको बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचा समावेश आहे. या बॅंकांच्या प्रतिनिधींचा महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राज्य बँकर्स समितीचे सहाय्यक व्यवस्थापक भरत बर्वे, अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी आदी उपस्थित होते. या सत्कार समारंभाच्यानिमित्ताने राज्यातील जिल्हानिहाय पतपुरवठ्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली.

पतपुरवठ्यातील टॉप टेन जिल्हे, कर्जवाटप (रुपयांत)

पुणे --- १९७ कोटी ७५ लाख ९१ हजार

वर्धा --- १९६ कोटी ७२ लाख १० हजार

सोलापूर --- १९२ कोटी ९० लाख ३८ हजार

जळगाव --- १८८ कोटी ६४ लाख ८१ हजार

चंद्रपूर --- १७८ कोटी ५८ लाख २४ हजार

कोल्हापूर --- १६३ कोटी ३२ लाख १५ हजार

नागपूर --- १५९ कोटी ७५ लाख ५७ हजार

यवतमाळ --- १५० कोटी ७१ लाख ८४ हजार

अमरावती --- १४० कोटी ९२ लाख ४९ हजार

रत्नागिरी --- १३० कोटी ७६ लाख ९० हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com