esakal | जमीन घोटाळा प्रकरण: खडसेंच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | Eknath khadse
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

जमीन घोटाळा प्रकरण: खडसेंच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मंदाकिनी खडसे यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयाने सदर अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

याचा प्रकरणात एकनाथ खडसे हे आज सत्र न्यायलयात हजर होऊ शकले नाही. एकनाथ खडसेंची शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.

हेही वाचा: मुंबई: भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीआधी घडली महत्त्वाची घडामोड

अजूनही काही दिवस ते रुग्णालयातच राहणार असल्याचे त्यांच्या वक़िलांनी कोर्टात सांगितलं. खडसेंच्या वकिलांनी कोर्टात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. न्यायलयातर्फे खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ दिला गेला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

loading image
go to top