esakal | मुंबई: भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीआधी घडली महत्त्वाची घडामोड
sakal

बोलून बातमी शोधा

mns bjp

मुंबई: भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीआधी घडली महत्त्वाची घडामोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला (bmc election) आता काही महिन्यांचा अवधी उरला आहे. पुढच्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. काहीही करुन यावेळी मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याचा चंग भाजपाने (bjp) बांधला आहे. त्या दृष्टीने भाजपा तयारी करत आहे. फक्त भाजपाच नाही, तर काँग्रेस आणि मनसे (mns) हे दोन पक्ष सुद्धा आतापासूनच तयारी करत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी अलीकडेच नाशिक, पुण्याचा दौरा केला. पदाधिकाऱ्यांच्या सतत बैठका सुरु आहेत.

एकूणच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाची कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीआधी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी बाळा नांदगावकर हे सागर बंगल्यावर आले होते.

हेही वाचा: मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं- पंकजा मुंडे

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशिष शेलार देखील आधीपासूनच उपस्थित होते. आशिष शेलार सध्या सातत्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर हल्ला करत आहेत. "माझ्या वैयक्तिक कामासाठी मी देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती. दोन्ही नेते भेटल्यानंतर राजकीय विषयावर चर्चा होतच असतात" असे नांदगावकर म्हणाले. "त्यांनी मला दुपारी तीन वाजता बोलवलं होतं. पण मला यायला उशीर झाला. त्यामुळे मी थोड्या वेळापूर्वी त्यांची भेट घेतली आहे" असे नांदगावकर म्हणाले.

हेही वाचा: 'मी आजही मुख्यमंत्री', फडणवीसांच्या विधानावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

मागच्या काही काळापासून मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसेची युती होईल अशी चर्चा आहे. मध्यंतरी तशी विधाने सुद्धा झाली होती. आजची भेट त्यासाठीच होती, असे म्हणता येणार नाही. पण भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीआधी ही भेट झाली हे महत्त्वाचे आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, श्रीकांत भारतीय हे भाजपाचे नेते कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित आहेत.

loading image
go to top