rajnish seth
rajnish sethsakal

Police Sports Competition : पुण्यात ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्धघाटन

राज्य पोलिस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले.
Published on
Summary

राज्य पोलिस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले.

घोरपडी, पुणे - राज्य पोलिस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले. वानवडीतील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे सुरू असलेल्या ३३ व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा २०२३ चे उद्घाटन पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुप कुमार सिह, अतिरिक्त पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, होमगार्डचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलिस महासंचालक संजय कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, विनय कुमार चौबे आदी या वेळी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील एकूण १३ संघ सहभागी होत असून, १८ क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. राज्यातून २ हजार ५९० खेळाडू सहभागी झाले आहेत.

पोलिस महासंचालक सेठ म्हणाले, पुण्यात पोलिस क्रीडा संकुल उभारण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. पोलिस दलातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य, सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या स्पर्धेतील सहभागामुळे खेळाडूंचा दर्जा उंचावून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करतील.

स्पर्धेत सहभागी सर्व १३ संघांनी शानदार संचलन केले. संचलनप्रमुख पोलिस उपनिरीक्षक किशोर कुमार टेंभुर्णे यांनी खेळाडूंना शपथ दिली. प्रारंभी पोलिस दलातील श्वान पथकाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.

मुख्यमंत्री आलेच नाहीत; खेळाडूंचा हिरमोड..!

वानवडीतील एसआरपीएफ मैदानावर पोलिस क्रीडा स्पर्धा ७ जानेवारी रोजी सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी होणार होते. मात्र, काही कारणास्तव मुख्यमंत्री उद्घाटन समारंभास येऊ शकले नाही. त्यामुळे पोलिस दल व खेळांडूचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com