
Maharashtra Weather
Sakal
पुणे : मॉन्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतल्यानंतर राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. आज (ता. १७) सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.