Video : रोहित पवार अन् अजित पवार पहिल्यांदाच एकत्र; म्हणाले, आम्ही घाबरत नाही...

rohit pawar ajit pawar
rohit pawar ajit pawaresakal
Updated on

पुणेः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं. पुण्यातील बैठकीसाठी हे नेते एकत्र दिसले. त्याचा फोटोदेखील व्हायरल झाला आहे.

कुकडी आणि सीनाच्या पाणी प्रश्नासंदर्भात बैठकीच चर्चा झाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. बैठकीनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघाचा विषय होता तो मी मांडला. ज्या गोष्टी हिताच्या आहेत त्या करुन घेतल्या याचं समाधान आहे. आम्ही लोकांसाठी कधीही राजकारण करत नाही.

rohit pawar ajit pawar
Maratha Reservation : आंतरवालीच्या सभेचं फंडिंग विचारणारे देवेंद्र फडणवीसच; प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला मुद्दा

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी कधीही राजकारण करत नाही. विरोधकांनी एमआयडीसी अडवून प्रवृत्ती दाखवून दिली. मात्र आम्ही विरोधकांकडेही जातो आणि मदत मागतो.. विकासासाठी लाजत नाही आणि घाबरतही नाही.

rohit pawar ajit pawar
Ambedkar-Pawar Meeting : शरद पवार, प्रकाश आंबेडकरांची झाली भेट; 'इंडिया'त सामिल होण्याचा मार्ग मोकळा?

अजित पवार आणि रोहित पवार हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवारांनी २ जुलै रोजी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपदही मिळालं. फुटीनंतर रोहित पवारांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र प्रत्यक्षात भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com