Pune: धक्कादायक! 'या' घाटात फेकले मृत प्राणी, दुर्गंधी सुटल्यानंतर प्रकार उघडकीस

Pune News: कात्रज घाटात मृत प्राणी फेकल्याची घटना समोर आली आहे. दुर्गंधी सुटल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
Dead animals thrown in Katraj Ghat
Dead animals thrown in Katraj GhatESakal
Updated on

कात्रज घाटात मुख्य रस्त्यालगत भिलारेवाडी वनविभाच्या हद्दीत मृत प्राणी फेकण्यात आले आहेत. याठिकाणी १७ डुक्कर प्राण्यांचे अवशेष आढळून आले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या परिसरात कर्तव्यावर असलेले वनसेवक संभाजी धनावडे यांना ही घटना समजली. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागास कळविल्यानंतर पथकाने पाहणी केलीअसता, मृतावस्थेतील डुक्करे आढळून आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com