
मनोज कुंभार, वेल्हे (राजगड)
वेल्हे : राजगड तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे कामथडी (ता.भोर) ते पाबे (ता.राजगड) ४० किलोमीटर लांब ३३ केव्ही वीज वाहिनीच्या तुटलेल्या तारांची रात्रभर पावसात चिखल तुडवत बारा तासात दुरुस्ती केल्याने राजगड तालुक्यातील ४१ गावांसह वाड्या वस्त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी महावितरणचे कौतुक केले आहे.