Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर 'फेस मास्क'; खबरदारीचा उपाय?

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर 'फेस मास्क'; खबरदारीचा उपाय?
Updated on

पुणेः मागील आठवड्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. हे प्रकरण सध्या तापलेलं आहे. त्यामुळे आज एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील चक्क फेस मास्क घालूनच अवतरले.

पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी फेस मास्क घातला होता. खबरदारीचा म्हणून चंद्रकांत पाटलांनी हा उपाय केल्याचं बोललं जात आहे. आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार अशा आशयाची पोस्ट विकास लोले यांच्याकडून करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यावरून राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर तापलं होतं. ''आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार?* मु.पो.सांगवी , पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या'' या अशा आशयाची पोस्ट लिहण्यात आली आहे. ...तोंड काळे करा रे, असा धमकीछा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील मास्क घातलेल्या अवस्थेत कार्यक्रमाला पोहोचले. मास्क घालूनच त्यांनी भाषणदेखील केलं आहे. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी ही खबरदारी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com