Pune Rain: पुण्यात १० ठिकाणी झाडपडीच्या घटना तर दोन ठिकाणी शॉर्टसर्किट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune rain water

Pune Rain: पुण्यात १० ठिकाणी झाडपडीच्या घटना, तर दोन ठिकाणी शॉर्टसर्किट

पावसानं राज्यात विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा राज्यात सक्रीय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासोबतच वारे देखील वाहत आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील 24 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर शुक्रवारी हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.

मुंबई, पुणे आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पुण्यातही मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरात 10 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहिती नुसार सकाळी मुंढवा जॅकवेल पुलावरून पाणी वाहत असल्याने, अग्निशमन दल दाखल झालं होत. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीस हा पूल बंद केला होता. तर शहरात दोन ठिकाणी किरकोळ स्वरूपात शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: PM मोदी आंबेडकरांचे खरे अनुयायी; रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

या ठिकाणी झाली झाडपडी

सेनापती बापट रोड

नगर रोड, सन फ्रान्सिस शाळा

सासवड रोड, भोसले व्हिलेज

वारजे स्मशानभूमी जवळ

सिहंगड रोड, हॉटेल ब्रम्हा

कोरेगांव पार्क

मुळा रोड, एन्थनी चर्च

औंध, परिहार चौक

बाणेर, पॅनकार्ड क्लब रोड

कर्वे रोड, नळस्टॉप चौक

Web Title: Pune Rain Incidents Tree Fall Places Short Circuit Two Places

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerainBridge Riverlight