महिला अत्याचारात राज्यात पुणे दुसरे

ब्रिजमोहन पाटील
रविवार, 21 एप्रिल 2019

घटना रोखण्यासाठी ‘बडी कॉप’ 
महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी पुण्यात ‘बडी कॉप’ हा उपक्रम पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे वेगवेगळ्या भागातील हजारो महिला थेट पोलिसांच्या संपर्कात आहेत. त्यांना होणाऱ्या त्रासाची त्या मेसेजवर तक्रार करू शकत असल्याने अनेक घटनांना प्रतिबंध बसत आहे.

पुणे - गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ठाणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) देण्यात आलेल्या माहितीमध्ये ठाण्यात २२१, तर पुण्यामध्ये २२० घटना घडल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. 

महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास गतीने करून त्याचा अहवाल सादर करावा, असा आदेश सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महसंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्य पोलिसांना दिला आहे. यामध्ये २१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ मध्ये महाराष्ट्रात दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारीही दिली आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे गुन्हे घडूनही बदनामीच्या भीतीने महिला तक्रारी देत नव्हत्या, त्यामुळे या विकृतीला बळ मिळत होते. मात्र आता शासकीय व सामाजिक स्तरातून महिलांच्या अन्यायाविरोधात भक्कम भूमिका घेतली जात आहे. समुपदेशनामुळे पीडित महिलेला आधार मिळत असल्याने तक्रार देण्यासाठी त्या पुढे येत आहेत. पालघरसारख्या आदिवासी भागात १५९, तर नागपूरमध्ये १४८ या पाच भागांत सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune second in the state of women atrocity Crime