esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

sarthi

सारथी संस्थेच्या नव्या इमारतीचा शरद पवार यांनी घेतला आढावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १) पुण्यात नव्याने साकारत असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) नवीन इमारतीच्या कामाबाबतचा आढावा घेतला. या इमारतीबाबतचे सादरीकरण पाहिल्यानंतर त्यात कोणत्या सुधारणा कराव्यात, याबाबतच्या सूचनाही पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

पुण्यातील शिवाजीनगरमधील भांबुर्डा येथे सारथी संस्थेची नवीन इमारत साकारत आहे. या इमारतीसाठी राज्य सरकारने गट क्रमांक १७३७-१मधील ४ हजार १६३ चौरस मीटर सरकारी जागा दिली आहे. या जागेवर सारथी संस्थेचे नवे कार्यालय उभारले जात आहे. या इमारतीच्या कामाचा आढाव्यासाठी आज (ता. १) दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीला सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कंगना राणावत CM योगींच्या भेटीला! राजकारण की मनोरंजन? चर्चांना उधाण

‘सारथी संस्थेशी संबंधित अन्य सर्व प्रलंबित विषय त्वरित मार्गी लावून, तळागाळातील मराठा समाजासाठी ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. या नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना शरद पवार यांनी यावेळी केल्या. नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना सारथी संस्थेची मदत झाली. समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांच्या मागे राहण्याचे काम सारथी ही संस्था करत असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

loading image
go to top