
प्रज्वल रामटेके
पुणे : ‘‘मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. माझे आई-वडील शेतमजुरी करतात. त्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची आहे. पोलिस दलात सहभागी होईन, हे स्वप्न उराशी बाळगून सकाळी पोलिस भरतीची तयारी आणि घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी रात्री काम करतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी लवकरच पोलिस भरती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे भरतीच्या तयारीला अधिक जोरात सुरुवात केली. मात्र, अद्याप पोलिस भरतीबाबत कोणतीच जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे डोळ्यांसमोर अंधार उभा झाला आहे,’’ अशी व्यथा भरतीची तयारी करणाऱ्या रोहित गुंड या उमेदवाराने मांडली.