Bhanwar Singh Duplicate In Aheri : संतोष मद्दीवार : सकाळ वृत्तसेवा, अहेरी (जि. गडचिरोली), ता. १७ : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नुकताच प्रदर्शित झालेला पुष्पा-२ धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील 'झुकेगा नही साला' म्हणणारा अल्लू अर्जुन जेवढा प्रेक्षकांचा आवडता आहे तेवढीच पसंती आयपीएस अधिकारी भंवरसिंह शेखावतची भूमिका करत असलेल्या अभिनेता फहाद फासिललासुद्धा मिळत आहे. पण गंमत म्हणजे फहाद फासिलने साकारलेल्या भंवर सिंहसारखी डिट्टो दिसणारी एक व्यक्ती जिल्ह्याच्या अहेरी पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे.