
Uorfi Javed : उर्फी प्रकरणात भाजपचा चित्रा वाघ यांना पाठिंबा नाही? बावनकुळेंच्या विधानाने गोंधळ
मुंबईः उर्फी जावेद प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं आजचं विधान.
उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टार्गेट केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी उर्फीने उघडं-नागडं फिरु नये, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणत आहेत. तर दुसरीकडे उर्फी जावेद चित्रा वाघ यांची खिल्ली उडवत 'मेरा डीपी ढासू चित्रू मेरी सासू' असे ट्विट करीत आहे.
हा वाद महिला आयोगापर्यंत पोहोचला. महिला आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्येकाला कपड्यांचं स्वातंत्र्य असल्याचं म्हटलं आहे.
मात्र चित्रा वाघ यांनी महिला आयोग दुटप्पीपणा करीत असल्याचा आरोप करत रुपाली चाकणकर यांनाही टार्गेट केलं. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. चित्रा वाघ यांनी मात्र उर्फीच्या कानशीलात लगावण्याची धमकी दिलीय.
हेही वाचाः जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'
त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उर्फी प्रकरणाबद्दल एक विधान केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे जालना जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना 'उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं का?' असा काहीसा प्रश्न विचारला.
हेही वाचा: Russia Ukraine War : पहिल्यांदाच रशिया भीतीच्या सावटाखाली; युक्रेन करु शकतो राजधानीवर हल्ला
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ज्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली आहे, त्यावर त्या बोलायला सक्षम आहेत. भाजपमध्ये समर्थक किंवा बेसमर्थक असं काहीही नसल्याचं बावनकुळे म्हणाले.