धक्कादायक! १,५०० ते १०,००० घेऊन ‘आयटी’तील जॉबसाठी तरुणांना परीक्षा पास करून देणारे सोलापुरातील रॅकेट उघड; ४००० तरुणांकडून घेतले २ कोटी, वाचा...

संगणक प्रशिक्षण संस्था तथा कंपनीचा नोंदणीकृत परवाना घेऊन अश्पाक अत्तार (रा. राजस्वनगर, सोलापूर) याने ‘आयटी’तील तरुणांना गैरमार्गाने परीक्षा पास करून देण्याचा धंदा सुरू केला होता. सायबर पोलिसांना याची खबर लागली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली व अश्पाकला जेरबंद केले. त्याने एका वर्षात चार हजार तरुणांकडून सरासरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन कोटी रुपये घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे.
IT exam

IT exam

solapur

Updated on

सोलापूर : संगणक प्रशिक्षण संस्था तथा कंपनीचा नोंदणीकृत परवाना घेऊन अश्पाक अत्तार (रा. राजस्वनगर, सोलापूर) याने ‘आयटी’तील तरुणांना गैरमार्गाने परीक्षा पास करून देण्याचा धंदा सुरू केला होता. सायबर पोलिसांना याची खबर लागली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली व अश्पाकला जेरबंद केले. त्याने एका वर्षात चार हजार तरुणांकडून सरासरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन कोटी रुपये घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे.

अश्पाक हा काही वर्षांपूर्वी तरुण-तरुणींना संगणक प्रशिक्षण देण्याचे काम करीत होता. त्यामुळे त्याला संगणकाविषयी भरपूर माहिती होती. दरम्यान, ‘आयटी’ कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना प्रमोशन किंवा पगारवाढीसाठी एक काही महिन्यांचा कोर्स करावा लागतो. त्याचे प्रमाणपत्र कंपनीला द्यावे लागते. नव्याने ‘आयटी’ कंपनीत जॉबला लागण्यासाठी देखील काही कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यातून अश्पाकने राजस्व नगरातील सासरच्या घरातच कार्यालय सुरू केले. तो स्वत: व त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणी एकदा सकाळी कार्यालयात गेल्या की सायंकाळीच बाहेर येत होत्या.

त्यामुळे परिसरातील लोकांना त्याच्या कामाबद्दल संशय आला. त्याची खबर पोलिसांनाही मिळाली. त्या कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या व्यवसायाबद्दल खात्री केली आणि चार दिवसांपूर्वी कार्यालय उघडण्यापूर्वीच पोलिस तेथे पोचले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. कोठडी उद्या (मंगळवारी) संपणार असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सायबर पोलिसांत गुन्हा दाखल असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत.

कंपनी संगणक प्रशिक्षणाची अन्‌ काम परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे

पुण्यातील पिंपरी- चिंचवड परिसरात राहणारा अश्पाक अत्तार हा मार्च २०२५ रोजी सोलापुरात आला. सासरचे घर त्याने स्वत:च्या कार्यालयासाठी तथा कंपनीच्या कामकाजासाठी घेतले. अश्पाकने त्याच्या कंपनीच्या नावे करंट अकाउंट देखील काढले होते. त्याने रीतसर परवाना घेऊन ‘हायटेक’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्यात त्याने तरुणांना संगणकाचे ऑनलाइन प्रशिक्षण देणे अपेक्षित होते. मात्र, ‘आयटी’तील तरुणांना द्यावी लागणारी परीक्षा उत्तीर्ण करून देण्याचे बोगस काम तो त्या कंपनीच्या आडून करीत होता. पोलिसांनी त्याच्या बॅंक खात्याची माहिती गोळा केली असून, त्याचा मुख्य सर्व्हर देखील जप्त केला आहे. १४ लॅपटॉप व सात संगणक देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com