
नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली आहे. सोमवारी १८ आँगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.