Video: 'होय, तुम्ही मराठीतच बोला…'; राहुल गांधींचा पत्रकाराला आग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi ask journalist to ask question in Marathi bharat jodo yatra news

Video: 'होय, तुम्ही मराठीतच बोला…'; राहुल गांधींचा पत्रकाराला आग्रह

अकोला: कॉंग्रेसची 'भारत जोडो यात्रा' ही सध्या महाराष्ट्रातून जात आहे. नांदेडनंतर यात्रेने आतापर्यंत हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत प्रवास केला असून आता ती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहे. 20 नोव्हेंबरला ही यात्रा मध्य प्रदेशात दाखल होईल. दरम्यान आज राहुल गांधींची अकोल्यात पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी पत्रकाराला मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याचे दिसून आले.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. याच्या सुरुवातीला कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की ७१ दिवसांत राहुल गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद आहे, तसेच तुम्ही मराठीत किंवा हिंदीत प्रश्न विचारू शकता. तुम्ही मराठीत प्रश्न विचारला तरी नाना पटोले भाषांतर करून सांगतील. यावर पत्रकाराने मी हिंदीत बोलू शकतो असं सांगितलं यावर राहुल गांधी यांनी बाजूला बसलेल्या पटोले यांना थांबवत तुम्ही मराठीतच प्रश्न विचारा, तेच अधिक ठिक राहील असं सांगितलं.

हेही वाचा: Veer Savarkar : उद्धव ठाकरेंनी चूक सुधारली असेल तर…; चंद्रकांत पाटलांचं विधान

यावेळी पत्रकारांनी पहिला प्रश्न विचारला, त्यानंतर प्रश्न कळला का असे राहुल गांधींना विचारण्यात आले. यानंतर पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी "समझ गया, मराठी समझता हूं मै" असं म्हणतं त्यांना 'मराठी भाषा कळते' हे सांगून दिलं.

हेही वाचा: Har Har Mahadev : आता तरी डोळे उघडतील का? 'हरहर महादेव'वरून आव्हाडांचा राज ठाकरेंना संतप्त सवाल