राहुल गांधींच्या यात्रेला ब्रेक; हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे रवाना Bharat Jodo Yatra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या यात्रेला ब्रेक; हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे रवाना

औरंगाबादः मागील १२ ते १३ दिवसांपासून राहुल गांधी यांची भारत जोडा यात्रा महाराष्ट्रामध्ये आहे. आज ही यात्रा मध्यप्रदेशाध्ये दाखल होणार होती. मात्र राहुल गांधी हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे रवाना होत आहेत.

Gujarat Election 2022

सध्या गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपसहीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने तिथे जोर लावलेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानेच राहुल गांधी गुजराकतडे रवाना होत आहेत. त्यामुळे आज आणि उद्या भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे. परवापासून ही यात्रा मध्य प्रदेशातून सुरु होईल.

हेही वाचाः Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्या आज सभा होणार आहेत. त्यामुळे गुजरात निवडणुकीसाठी आजचा सुपर सोमवार ठरतोय. सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या निमखेडी फाट्यावर ही यात्रा पोहोचलेली आहे. इथूनच राहुल गांधी हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रस्थान करत आहेत. त्यानंतर औरंगाबाद येथून ते विमानाने गुजरातमध्ये दाखल होणार आहे. आज त्यांची सभादेखील होईल. दोन दिवसांनंतर ही यात्रा मध्य प्रदेशातून सुरु होईल.