नवी दिल्ली- नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या नियुक्तीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवे मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याचा निर्णय घेणे अपमानास्पद असल्याची तोफ राहुल गांधींनी डागली आहे.