Rahul Gandhi: राज्यातील पन्नास खोक्यांच्या वादात आता राहुल गांधींची उडी; म्हणाले मला एक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi: राज्यातील पन्नास खोक्यांच्या वादात आता राहुल गांधींची उडी; म्हणाले मला एक...

मुंबईः 'पन्नास खोके..एकदम ओक्के' या घोषणेने सत्ताधाऱ्यांची झोप उडववेली आहे. या वादात पहिल्यांदाच राहुल गांधी उडी घेतली आहे. राहुल गांधी हे अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.

''मला एक शिवसेनेचे आमदार भेटले. त्यांनाही ५० कोटी रुपयांची ऑफर आली होती. परंतु ते गेले नाहीत, त्यांनी ती ऑफर नाकारली. पण काही लोक पैशांसाठी विकले जात आहेत. असं असलं तरी चांगले लोकही आपल्याकडे आहेत'' असं म्हणत राहुल गांधी यांनी ५० खोक्यांच्या वादात उडी घेतली.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न भाजप सरकारला कळत नाहीयेत. त्यामुळेच ही यात्रा काढल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशाला रस्ता दाखवला. देशाला लढण्याची प्रेरणा गांधींनी दिली. त्यामुळे ही आजची लढाई समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचा मीडियावर कंट्रोल आहे, न्यायव्यवस्थेवर आणि इतर मोठ्या संस्थांवर दबाव आहे. आम्हांलादेखील संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही. म्हणूनच हा लढा स्वातंत्र्याचा असल्याचं गांधी म्हणाले.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी सावरकरांची 'ती' चिठ्ठीच वाचून दाखवली; अकोल्यात माध्यमांशी संवाद

दरम्यान, राज्यामध्ये खोक्यांचा वाद पेटलेला आहे. अशा पद्धतीने जो टीका करील त्याच्यावर कायदेशीर कारवाई दाखल होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. आता थेट राहुल गांधी यांनीच या मुद्द्याला हात घातल्याने राज्यातील सत्ताधारी नेते काय उत्तर देतात, हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.