महाराष्ट्र विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवडणूक अजून व्हायची आहे. अध्यक्षपदावर कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल नार्वेकर पुन्हा आघाडीवर आहेत. राहुल नार्वेकर यांना मंत्री केले तर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेही नाव चर्चेत आहे. महाराष्ट्राचे नवे आमदार ७ आणि ८ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. त्यानंतर अध्यक्षाची निवड होईल. आता विशेष म्हणजे भाजपला हे महत्त्वाचे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे. मात्र याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.