Shivsena Political Crisis: झिरवाळ बंडखोर आमदारांना अपात्र करणार? विधानसभा अध्यक्षांनी दिलं प्रत्युत्तर

राज्यातील सत्ता संघर्षावर कधीही सर्वोच्च न्यायालयातून निकाल येण्याची शक्यता
Shivsena Political Crisis
Shivsena Political CrisisEsakal

राज्यातील सत्ता संघर्षावर कधीही सर्वोच्च न्यायालयातून निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांची उत्सुकता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागली आहेत. या निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चा सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Political News)

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या भविष्याच्या दृष्टीकोणातून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही. या सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाच राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात किंवा देशात कोणतंही सरकार बहुमताच्या आधारावर सत्तेत आलेलं असतं. मी विधानसभेचा अध्यक्ष झाल्यावर शिंदे-फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. बहुमताचे आकडे माझ्यासमोर आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कोणताही निर्णय आला तरी हे सरकार अस्थिर नाही. या सरकारला धोका नाही, असं राहुल नार्वेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. (Latest Political News)

Shivsena Political Crisis
Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मोठा दिलासा

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्याकडे आमदारांचं प्रकरण आल्यास त्यांना अपात्र करू, असं म्हटलं होतं. त्यावरही राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपाध्यक्षांनी केलेल्या विधानाबद्दल मी बोलणं योग्य नाही. विधानसभा अध्यक्षपद हे जबाबदारीचं पद आहे. कोर्टात प्रकरण असेल तर त्यावर बोलता येत नाही. फार फार तर कायद्याच्या तरतुदीवर बोलता येतं. सार्वजनिक रित्या बोलणं योग्य ठरणार नाही. पण उपाध्यक्ष जे बोलले त्यावर तेच स्पष्टीकरण देऊ शकतील, असं नार्वेकर यांनी म्हंटलं आहे.

Shivsena Political Crisis
एकट्या शेतकऱ्याने अडवला मुंबई-गोवा महामार्ग; न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा | Mumbai-Goa Highway

पुढे ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद रिक्त असतं तेव्हा ते अधिकार उपाध्यक्षाला असतात. पण जेव्हा विधानसभा अध्यक्ष चार्ज घेतात. तेव्हापासून उपाध्यक्षाला दिलेले अधिकार काढून घेतले जातात. कोणताही कायदा प्रॉस्पेक्टिव्ह असतो रेस्ट्रोस्पेक्टीव्ह नसतो. त्यामुळे आज महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षपद रिक्त नाही. निलंबनाचा किंवा अपात्रतेचा निर्णय असो किंवा अध्यक्षांच्या अधिकारातील कोणताही प्रश्न त्याचा अधिकार अध्यक्षाला असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.(Latest Political News)

Shivsena Political Crisis
Nana Patole: तालुकाध्यक्ष पदावरुन काँग्रेसमध्ये वाद; थेट माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेना नेमलं निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com