एकट्या शेतकऱ्याने अडवला मुंबई-गोवा महामार्ग; न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा | Mumbai-Goa Highway

एकट्या शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुककोंडी झाली आहे.
Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwaySakal

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर एका शेतकऱ्याने आपल्याला न्याय मिळावा यासाठी रस्ता अडवून आंदोलन केले आहे. त्याच्या एकट्याच्या आंदोलनामुळे रस्ता अडला असून वाहतूक कोंडी झाली आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार नाही असा इशाराही या शेतकऱ्याने दिला आहे.

Mumbai-Goa Highway
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.

Mumbai-Goa Highway
उत्तेजक, असभ्य, हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही; पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा | Viral Poster

त्याच्या या कृत्याने काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तर पोलिसही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com