esakal | बजाज फाईनान्सच्या बनावट कॉल सेंटरवर छापा; नांदेड पोलिसांची ठाणे शहरात कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

चार दिवसाची पोलिस कोठडी

बजाज फाईनान्सच्या नावे बनावट कॉल सेंटर चालविणारे पोलिस कोठडीत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील सायबर सेल येथे अश्या मजकुराच्या तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या होत्या. सदर अर्जाचे अनुषंगाने सायबर सेल नांदेड येथील तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक अनिता चव्हाण ( सध्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. टी. एस. नांदेड) यांनी पडताळणी करुन तक्रारदार यांना ज्या मोबाईल क्रमांकावरुन कॉल आले त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन या बनावट काॅल सेंटरपर्यंत पोचल्या. त्यांच्या माहितीवरुन इतवारा पोलिसांच्या पथकाने ठाणे येथे जावून कारवाई केली. एवढेच नाही तर दोघाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 26 मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्रमांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असे एकूण रुपये एक लाख 10 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. शुक्रवारी (ता. ११) इतवारा पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ता. १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता चव्हाण यांनी या प्रकरणात आलेल्या बनावट काॅल सेंटरचे लोकेशन डोंबिवली, जिल्हा ठाणे येथे असल्याने ऑल इंडिया व महाराष्ट्र पोलिस टेलिग्राम ग्रुपचे सदस्य पोलिस उपनिरीक्षक श्री. घोडके, मुंबई शहर यांना संपर्क साधला. त्यांचे मदतीने पोलिस उपनिरीक्षक नितीन मुदगुन, गुन्हे शाखा, ठाणे युनिट, कल्याण यांना संपर्क साधला. त्यानंतर गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याण यांनी तांत्रिक विश्लेषण करुन केवळ मोबाईल लोकेशनवरुन अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्स असलेल्या परिसरात सुमारे १५ ते २० दिवस पाळत ठेऊन बनावट कॉल सेंटर निश्चित शोधून काढले.

हेही वाचा - पुण्यात घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशाराही

त्यानंतर इतवारा पोलिस ठाणे नांदेड येथे फसवणूक झालेल्या तक्रारदार यांची एफआयआर नोंद केली. परंतु त्या दरम्यान लॉकडाउन सुरु झाल्याने नमूद कॉल सेंटरचे कामकाज त्या ठिकाणाहून बंद करुन वेगवेगळ्या लोकेशनवर सुरु असल्याने कोणत्याही प्रकारची घाई न करता वारंवार तांत्रिक विश्लेषण सुरु ठेवले. मागील १० ते १२ दिवसापूर्वी पुन्हा पूर्वीच्या ठिकाणचे कॉल सेंटर चालु झाल्याने नांदेड येथील पोलिस पथकाला संपर्क करुन

ता. नऊ जून २०२१ रोजी नांदेड येथील पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णा काळे व पथक तसेच गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याणचे फौजदार श्री. मुदगुन, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. दायमा, फौजदार कळमकर व पथक यांनी गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांचे नेतृत्वाखाली मानपाडा पोलिस ठाणे हद्दीत सिटी मॉल पहिला माळा ११६, पेंढारकर कॉलेजजवळ, डोंबिवली या ठिकाणी इतवारा पोलिस ठाणे, नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 80/20 भादवि कलम 420, 406 प्रमाणे दाखल गुन्ह्यात बनावट कॉल सेंटरवर संयुक्तपणे छापा कारवाई केली होती.

हे उघडून तर पहा - नांदेड जिल्ह्यातील रत्नेश्वरी शिवारात साकारणार ऑक्सिजन वन; कोरोनामुक्त व्यक्तींच्या हस्ते वृक्ष लागवड

सदर ठिकाणी आरोपी दिनेश मनोहर चिंचकर ( वय 31) राहणार न्यू साईनाथ कॉलनी, रामदास वाडी, कल्याण व रोहित पांडुरंग शेरकर (वय 28) राहणार काकाच्या ढाब्याजवळ, कल्याण पूर्व हे १८ ते २० कर्मचारी नोकरीस ठेऊन उत्तर प्रदेश राज्यातील काही साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असताना मिळून आले आहेत. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेसमधील क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना लोन पास करणे करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे.

येथे क्लिक करा - रुमी जाफरी देणार रियाला मोठी संधी

पोलिसांनी सदर ठिकाणाहून 26 मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्रमांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असे एकूण रुपये एक लाख 10 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बनावट कॉल सेंटर स्थापन केलेला व्यक्ती व मॅनेजर म्हणून काम पाहणारा इसव्यक्ती यांना अटक करण्यात आली असून सदर ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी यांना अधिक तपास कामी इतवारा पोलिस ठाणे नांदेड येथे हजर राहणे बाबत समज देण्यात आली आहे. अश्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्यास इतवारा पोलिस ठाणे नांदेड किंवा गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याण येथे संपर्क साधावा.