
पाली : पंतप्रधान विमा योजनेसाठी पात्र ठरलेले जिल्ह्यातील जवळपास एक हजार 172 शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतिक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना 88 लाख रुपयांची विमा रक्कम देणे शिल्लक राहिले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्यासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याचा व बँक खात्याला आधार नंबर नसल्याचा हकनाक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.