Raigad: काळ आला होता पण... 40 प्रवाशांनी भरलेल्या बसचं नियंत्रण सुटलं, दरीत कोसळणार इतक्यात...; अपघाताचा थरारक प्रसंग

Raigad Accident: रायगडकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसला पुनाडेवाडी येथे अपघात झाल्याची घटना घडली. मात्र यामध्ये 40 प्रवाशांचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे.
Raigad Accident

Raigad Accident

ESakal

Updated on

सुनील पाटकर

महाड : माणगाव रायगड मार्गावर महाड तालुक्यातील पुनाडेवाडी गावाजवळ घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून बस संरक्षण कठड्यावर अडकल्याने बस दरीत कोसळण्यापासून वाचली आणि आतमध्ये असलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले . आज 29 मे ला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com