
पाली : सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये शनिवारी (ता. 26) रात्री एक ते रविवारी (ता. 27) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले. यावेळी घरातील सोने व रोकड लुटून पसार झाले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.