
पाली : प्रलंबित शुद्ध फिल्टर पाणी योजना, बस स्थानकाची दुरावस्था, रस्त्यातील खड्डे, अतिक्रमणे, डम्पिंग ग्राउंड ची दैना अशा विविध समस्यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला ग्रासले आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी पालीतील नागरिक तसेच पाली सुधागड संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून अनेक तक्रारी, निवेदने, निदर्शने, आंदोलने व वरिष्ठ पातळीवरील पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविल्याने संस्थेने अखेर गांधीगिरीचा मार्ग अवलंबून नागरिकांकडूनच निबंधाच्या माध्यमातून या समस्या व विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.