
भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून सुरु असलेल्या उत्खनना दरम्यान मोठा ऐतिहासिक पुरावा सापडला आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. 'यंत्रराज' हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे 'Astrola ृbe' म्हणजेच ‘यंत्रराज’ सापडल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.