

Historic Rajsadar Restoration Begins at Raigad Fort
Esakal
महाड, ता. १४ (बातमीदार) : स्वराज्यातील अभिमानाचा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच राज्याभिषेकाशी नाते असलेले रायगड किल्ल्यावरील राजसदर म्हणजेच सिंहासन. हे राजसदर आणि राज्याभिषेक क्षेत्राच्या संवर्धनाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने गती दिली आहे. त्यामुळे आता पारदर्शक काचेतून राजदरबाराच्या मूळ अधिष्ठानाचे दर्शन शिवप्रेमींना घेता येणार आहे. ऐतिहासिक पुरावे आणि मूळ वास्तुरचनेचा आधार घेत हे काम सुरू असून आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. Raigad Fort Rajsadar to Be Revived Before Shivrajyabhishek