
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील परळी येथे धक्कादायक घटना घडलीय. एका तरुणाने प्रेयसीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं सुधागड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनेच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.