ST BusESakal
महाराष्ट्र बातम्या
Raigad News: कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू! एसटीला पसंती, बसस्थानकांवर प्रचंड गर्दी
ST Bus Travel: दिवाळी साजरी केल्यानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून प्रवाशांनी एसटी गाड्यांना पसंती दिली आहे.
पोयनाड : दिवाळी साजरी करण्यासाठी स्वगृही आलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास रविवारी मोठ्या प्रमाणात सुरू झाला. पनवेल, मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नालासोपारा व नाशिक या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी पसंती दिली. सकाळपासूनच पोयनाड आणि पेझारी या बसथांब्यांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

