
पाली : रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे शाळेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून कै. अमोल दादा युवा प्रतिष्ठान धोंडसे यांजकडून शाळेतील सर्वच मुलांना दप्तर, विविध प्रकारच्या वह्या, पेन, क्रीडा गणवेश, इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.