Accident
sakal
अलिबाग : अलिबाग-रेवदंडा मार्गावरील रस्त्याच्या कामाने आणखी एका नागरिकाचा बळी घेतला आहे. नागाव खारगल्ली येथे गुरुवारी (ता. १९) सार्यकाळी झालेल्या अपघातात बोरपाडा येथील प्रकाश भगत (वय ४८) यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने दुचाकी २० फूट खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी संबंधित ठेकेदाराचा एकही कामगार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे.