esakal | अवघ्या तीन महिन्यांत १०४ टक्के पाऊस; महाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

अवघ्या तीन महिन्यांत १०४ टक्के पाऊस; महाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : सुरुवातीपासून सातत्याने पडणाऱ्या पावसाने रायगड (Raigad) जिल्ह्यात यंदा अवघ्या तीन महिन्यांतच सरासरी (rainfall) ओलांडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०४ टक्के पाऊस पडला असून संततधार सुरू असल्याने विक्रमी (Record break monsoon) पावसाची नोंद होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: कल्याण डोंबिवली पालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

जिल्ह्यात मान्सून सुरू झाल्यानंतर हंगामात तीने हजार २१६ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. या वर्षी अवघ्या तीन हजार ३५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाने दरवर्षीची सरासरी आताच ओलांडली. आतापर्यंत मुसळधार पावसाने झालेल्या दुर्घटनांमध्ये एकूण ११२ जणांना जीव गमवावा लागला. पुरामुळे अनेक वेळा वाहतूक विस्कळित झाली. भातशेती वाहून गेली. घरांचेही नुकसान झाले. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मुरूड तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात आतापर्यंत १५९.०४ टक्के पाऊस पडला आहे. ७ सप्टेंबर पूर्वी १२ जुलैला पडलेल्या मुसळधार पावसाने मुरूड तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

महाड तालुक्यात आतापर्यंत सरासरी ८९.६३ टक्के पाऊस पडला. पण या तालुक्यात जीवितहानीचे प्रमाण इतर तालुक्यांपेक्षा सर्वात अधिक आहे. तळीये, केवनाळे येथील दरडींमुळे ही संख्या वाढत गेली. २२ जुलैच्या अतिवृष्टीत महाड शहारात दोन दिवस पूरपरिस्थिती होती. यामुळेही येथील नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडला असला तरी कर्जत, खालापूर, माणगाव, सुधागड या तालुक्यांमध्ये ही सरासरी इतर तालुक्यांप्रमाणे कमी आहे.

सप्टेंबरमध्येही अतिवृष्टी

साधारणतः सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान पावसाचा जोर कमी असतो; परंतु या वर्षी पावसाचे सातत्य कायम आहे. या महिन्याची दर वर्षाचे पर्जन्यमान सरासरी ३८६ मिलिमीटर आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील १२ दिवसात ४४९ मिलिमीटर नोंद झाली. ही नोंद ११६ टक्के इतकी झाली आहे. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी क्वचितच होत असल्याचे म्हणणे येथील वयोवृद्ध नागरिकांचे म्हणणे आहे.

loading image
go to top